श्रीगुरूकुलम् न्यास ही संस्था २०१३ सालापासून भारतीय संस्कृती संवर्धन व प्रचार प्रसाराचे कार्य श्रीभगवद्गीता या सार्वकालिक गंथाच्या माध्यमातून करीत आहे. संस्थेने कार्यविस्तारासाठी भगवद्गीतेतील पंचसूत्रीला आधारभूत मानले आहे.
रायगड, ठाणे, नाशिक आणि पालघर या चार जिल्हयांमध्ये श्रीगुरूकुलम् न्यास आपल्या 40 शिक्षकांच्या माध्यमातून कार्यरत आहे. भगवद्गीता, व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक व बौध्दिक विकासासाठी अभ्यासणे आवश्यक आहे याची जाणीव प्रत्यक्ष समाजामध्ये मिसळून, संथा वर्ग, सखोल अभ्यासक्रम शालेय प्रकल्प या विविध आयामांमार्फत निःशुल्क पध्दतीने जागवीत आहे.
श्रीगुरूकुलम् न्यासाचे महत्वाचे प्रकल्प आपल्या निदर्शनास आणू इच्छित आहोत.
अमृतस्पर्शी भगवद्गीता प्रश्नमंजुषा स्पर्धा
भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाचे मर्म सांगणारे 18 परिच्छेद, न्यासाच्या शिक्षकांनी मिळून तयार केले आहेत. त्यावर आधारित प्रत्येकी दहा वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरे स्मरणशक्ती चाचणीप्रमाणे परिच्छेद दूर ठेवून सहभागींनी द्यायची असतात. त्यानुसार प्रत्येक सहभागीला श्रीगुरूकुलम् न्यासाकडून श्रेणीच्या उल्लेखासह प्रशस्तीपत्र दिले जाते. यामध्ये 10 वर्षापासून ते 80 वयाचे कोणीही भाग घेऊन गीतेची ओळख सोप्या भाषेत (मराठी, हिंदी, इंग्रजी) करून घेतात. आतापर्यंत सन 2022-23 मध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, माहूर, हिवरे, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, ठाणे, कल्याण, बदलापूर, डोंबिवली, विरार आगाशी, पनवेल इत्यादी ठिकाणी महाराष्ट्रात घेतली आहे. यापुढे महाराष्ट्राबाहेर मध्यप्रदेश, गुजरात वैगेरे राज्यांमध्येही संपर्क झाला आहे. तिथे जाऊन ही स्पर्धा घेण्याचा श्रीगुरूकुलम् न्यासाचा मानस आहे. आतापर्यंत या माध्यमातून 2000 पेक्षा अधिक व्यक्तींना गीतेविषयी जिज्ञासा जागृत करण्यात न्यास यशस्वी झाला आहे.
स्वातंत्र्य वीरांप्रती कृतज्ञतापूर्वक गीतापठयज्ञ
श्रीगुरुकुलम् न्यासाचा हा अत्यंत अभिनव उपक्रम आहे. यामध्ये न्यासाचे 150-200 कार्यकर्ते छात्र स्वखर्चाने आपले योगदान देत आहेत. यामध्ये संपूर्ण गीतापठण (वाचन) केले जाते. आतापर्यंत भगूर, चिरनेर, चिंचवड, शिरढोण, काळाराम मंदिर नाशिक अशा विविध ठिकाणी न्यासाने हे कार्यक्रम संपन्न केले आहेत.
शालेय प्रकल्प
भावी पिढीप्रती योगदान रूजू करण्याच्या दृष्टीने विविध शाळांमध्ये भगवद्गीता स्पष्ट, शुध्द उच्चारांसह शिकविणे, स्मरणशक्ती विकास, आत्मविश्वास वाढविणे, विचारांचा नेमकेपणा विद्याथ्र्यांमध्ये यावा, यासाठी या माध्यमातून न्यासाचे शिक्षक वैविध्यपूर्ण आयामांमार्फत कार्य करीत आहेत. या शाळा शक्यतो ग्रामीण भागाशी जोडलेल्या असाव्यात, असा प्रयत्न आहे. डेकेअर सेंटर मधील 3 ते 8 वर्षांपर्यंतच्या छोटया मुलांसाठीदेखील आपले शिक्षक अशा प्रकारचे काम रूजू करतात
संथा वर्ग, कंठस्थ सखोल अभ्यासक्रम
या आयामांद्वारे,
1) गीतेतील श्लोकांचे शुध्द उच्चारण, तसेच गीतेतील पंचसूत्रीचा मागोवा घेणारे अर्थपूर्ण विवेचन, प्रत्यक्ष गुरूकुल पध्दतीने वर्ग घेऊन केले जाते. 2) संपूर्ण गीता पाठ करणार्यांना शृंगेरी पीठाधीश श्रीशंकराचार्याचे आशीर्वाद व प्रोत्साहन पुरस्कार प्राप्त व्हावा म्हणून तयारी घेऊन शृंगेरी येथे पाठवले जाते. आतापर्यंत न्यासामार्फत 70 हून अधिक छात्र असे सुयश व समाधान मिळवून आले आहेत. न्यासाच्या कार्यात प्रत्यक्ष योगदान देत आहेत तसेच इतरांसाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहेत. यामध्ये वय वर्षे 7 ते 75 पर्यंतचे छात्र सहभागी आहेत. 3) ‘सुबोध गीतासार’ हा त्रिस्तरीय सखोल अभ्यासक्रम श्रीगुरूकुलम् न्यासाने तयार करून प्रत्यक्ष कार्यवाहीत आणला आहे.
प्रथम स्तर – भगवद्गीता, द्वितीय स्तर – भगवद्गीता, उपनिषदे, संस्कृत व्याकरण तृतीय स्तर – आनुषंगिक अभ्यासचिंतन, मनन व प्रत्यक्ष सादरीकरण. यामध्ये 150 हून अधिक छात्र अभ्यास करीत आहेत, तर 75 हून अधिक छात्रांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
पंचगव्याधारित उत्पादनांसाठी प्रशिक्षण वर्ग
ग्रामीण सुदूर क्षेत्रतील व्यक्तीही न्यासाशी संपर्कात याव्यात, यादृष्टीने न्यासाने आपल्या चार कार्यकत्यांना वर्धा येथे ‘एमगीरी’ मार्फत आयोजित प्रशिक्षणासाठी पाठवले होते. हे प्रशिक्षण केंद्र सरकारच्या एमएसएमई योजनेचा भाग आहे. त्यामुळे या चार प्रशिक्षकांना केंद्र सरकार व एमगिरी तर्फे प्रशस्तीपत्र या प्रशिक्षण देण्याचे अधिकर प्राप्त झाले आहेत. सटाणा तालुका आसखेडा गाव, सिन्नर तालुका निमगाव देवपूर येथे प्रशिक्षण शिबिरे ग्रामस्थांसाठी निश्चित करण्यात आली आहेत. यानिमित्ताने प्रशिक्षणार्थींना भगवद्गीता संस्कार देता येतील हा उद्देश !
संपूर्ण योगाभ्यासातून सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास
1) सर्टिफिकेट कोर्स 2) डिप्लोमा कोर्स, 3) डिग्री कोर्स, अशा स्तरांसाठी अभ्यासक्रम आखणी पूर्णत्वाकडे येत आहे. त्यासाठी आवश्यक प्रशिक्षक श्रीगुरूकुलम् न्यासाकडे आहेत. सध्या न्यासाच्या शिक्षकांकडून प्रशिक्षित छात्र राष्ट्रीय स्तरावर योगस्पर्धांमध्ये सुयश मिळवीत आहेत. भगवद्गीतेमधील योगाभ्यास समजून घेत आहेत.
श्रीगुरूकुलम्न्यासाची विशेष उपलब्धी
अंध (दिव्यांग) विद्यार्थ्यांचे विकसन होऊन त्यांना स्वप्रतिष्ठा प्राप्त व्हावी यासाठी भगवद्गीतेच्या माध्यमातून न्यासाचे शिक्षक प्रयत्नशील आहेत. त्याचवेळी त्यांच्यातील हस्तकौशल्य विकसित करण्यासाठी ही शिक्षक काम करीत आहेत.
‘अनंत अमुची ध्येयासक्ती – अनंत अन् आशा….. ’
‘अविरत विस्तार’ भारतीय संस्कृतीच्या अधिष्ठानांमार्फत समाजविकास ! ‘कृण्वतो विश्वम् आर्यम् !!’
न्यासाच्या प्रचार, प्रसार कार्याचे प्रत्यक्ष प्रमाण आपल्याला मिळावे, तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे, यासाठी श्रीगुरुकुलम् न्यासाने मराठी तसेच हिंदीमधून ‘गीतागुंजन – पैरवी भगवद्गीतेची’ या कार्यक्रमाद्वारे यू-टयूब वाहिनीचाही शुभारंभ केला आहे.
आपले विनित
विनम्र आवाहन
श्रीगुरुकुलम् न्यासाच्या कार्यान्वित उपक्रमांसाठी आपल्या आर्थिक योगदानाची अपेक्षा.
न्यासाचे सर्व कार्यक्रम नि:शुल्क पद्धतीने चालतात.
सर्व वयोगटातील व्यक्तींच्या सहभागासाठी विशेष प्रयत्न केले जातात.
न्यासास दिलेल्या देणग्या ह्या 12-A आणि 80-G सवलतीस पात्र आहेत.
न्यासाच्या बँक खात्याचे विवरण
खात्याचे नांव : SHREEGURUKILAM NYAS
बँकेचे नाव : The Kalyan Janata Sahakari Bank Ltd.
शाखा : Main Branch
खाते क्रमांक : 002010100061742
IFSC Code : KJSB0000002